Abstract : शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. समाज जीवनाच्या गरजा, आशा-आकांक्षा व उद्दिष्टे यांच्याशी शिक्षणाचा निकटचा संबंध आहे. समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विचार प्रवाहांना सुयोग्य वळण देण्याचे काम शिक्षणाचे आहे. मनुष्याची अस्मिता आणि अस्तित्व शाबुत ठेवून त्याला स्वावलंबनाने, स्वाभिमानाने आणि सुखाने जगण्याचा मार्ग दाखविणे हे शिक्षणाचे सर्वांत महत्वाचे कार्य आहे. त्यामुळे समाजाची सर्वांगीण प्रगतीसाठी समजातील सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे. परंतु भारतीय समाजात शिक्षण घेण्याचा अधिकार मुठभर लोकांनाच होता. त्यामुळे बहुसंख्य बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता.