Abstract : वसंतरावजी नाईक यांची खरी ओळख ही महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक अशी आहे. ग्रामीण भागातील बंजारा समाजात जन्मलेले नाईक साहेब स्वकर्तुत्वाने राजकारण व समाजकारण यात तळपू लागले. बुद्धिमता, संघटन कौशल्य, दुरदुष्टी, अखंड परिश्रम, सर्वसामान्य, उपेक्षित व शेतकऱ्याबद्दली कळकळ हे त्यांचे गुण त्यांना राजकारणांच्या सर्वोच्च पदावर पोहचून सुध्दा ते मनाने शेतकरीच होते. वसंतरावजी नाईकांनी आधुनिक महाराष्ट्राचे नेतृत्व केले त्याचबरोबर त्यांनी या काळात राजकारणासोबत समाजकारण पण केल्याचे दिसून येते ते आधुनिक महाराष्ट्राचे राजकीय नेते होते.