Abstract : शब्द हे साहित्याचे माध्यम आहे. साहित्याच्या विविध प्रकारांतून समाजजीवनाचे चित्रण होते. साहित्यकृती ही प्रतिभेची निर्मिती असते. साहित्य हे समाजाच्या सर्जनषीलतेचे एक सुंदर रूप आहे. शक्तीरूप आहे व समाजाचे श्रध्दास्थानही आहे. कलावंताच्या निर्मितीच्या प्ररणेपेक्षा त्याच्या आविश्कार करण्याच्या पध्दतीषी सामाजिकतेचा घटक अधिक निगडित असतो. साहित्य हा समाजाचा आरसा असतो, असेही म्हटले जाते. साहित्य ही एक सामाजिक संस्था आहे. समाज या संकल्पनेचा संदर्भात विचार करताना केवळ मानव प्राणीच ‘सामाजिक, आहे. असे आपल्याला म्हणता जीवितरक्षणासाठी परस्परसंबंधाची व्यवस्था या अर्थाने मुंग्या, मधमाशा यांसारख्या कीटकांमध्येही समाजव्यवस्था असते.