Abstract : स्थिर समाजात अनेक घटक समाज रचनेच्या अस्तित्वासाठी आवश्यक असतात. आहे त्या समाजातून ते निवडले जातात. शेतकरी जरी अशा शेतीआधारित व्यवस्थेत महत्वाचा असला तरी शेतीसाठी व दैनंदिन जीवनातील गरजांचे पुर्ती करण्यासाठी आहे त्या समाजातूनच कुशल लोक पुढे येतात. आदय प्रथम जीवनोपयोगी व्यवसाय म्हणजे सुतार काम, पाथरवटकाम, गवंडीकाम, कुभांरकाम, चर्मकारकाम, इत्यादी जसे पुढे मानवोपयोगी शोध लागत गेले तसतसे पुढे अजुन कौशल्याधारित विभाजन होत गेले. हे एक प्रकारे प्राथमिक कार्यविभाजन असते. म्हणजे ही तशी अत्यंत सोपी, सैल आणि प्रवाही संरचना असते. टोळी मानव हा नगर मानव बनलेला आहे. काही टोळया अदयापही भटकेपणाच्या उर्मीतुन बाहेर पडलेल्या नसतात.