Abstract : इ.स.पुर्व 5 व्या शतकामध्ये ग्रिस मध्ये इतिहास लेखनाची प्रक्रिया सुरु झाली. पुढे तिचा विविध राष्ट्रात प्रसार होवून इतिहास लेखन विकसीत होत गेले. ज्या काळात इतिहास लिहला गेला त्या काळातील रुढ विचार मुल्य इतिहासात सामाविष्ट झाली. कोणतेही लेखन हे समाजाच्या उपयोगासाठीच असते. जर एखाद्या लेखनाचा समाजाला उपयोग होत नसेल तर त्या लेखनाची व त्यातील माहितीची किंमत शुन्य ठरत असते. काळाच्या ओघात असे लेखन लुप्त होते. इतिहासाची सुरवात इ.स. पुर्व 5 व्या शतकात झाली आणि आजही इतिहास लेखनाची प्रक्रिया निरंतर सुरु आहे.