Abstract : इ.सन १७०७ ते १८१८ हा मराठेशाहीचा कालखंड पेशवे कालखंड म्हणूनही इतिहासामध्ये ओळखला जातो. छ शिवारांयानी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची पुढील पायरी म्हणूनही मराठी कालखंडमध्ये पहिले जाते. शिवछत्रपतीचा नातू छ शाहू याने सातारा येथून राज्यकारभारास सुरुवात केली आणि मराठेशाहीच्या राजकारणासाठी सुरुवात केली. शिवछत्रपतीप्रमाणे राज्यकारभाराची आणि शौर्य पराक्रमाची उत्तुंग झेप शाहुच्या काळात नव्हती म्हणूनच अष्टप्रधान मंडळातील पेशावेपदास महत्त्व मिळाले आणि पेशवाई सुरु झाली.