Abstract : महाराष्ट्र ही संतांची आणि विरांची भूमी आहे. या भूमीत अनेक संत आणि महंत होऊन गेले. हया संताच्या शिकवणूकीतून उपदेशातून त्यांच्या जीवन कार्यातून महाराष्ट्र संस्कृतीला समाजमनाला प्रबोधन करण्याचे काम संत मंडळींनी केले. त्यातील एक संत कवयित्री म्हणजे कान्होपात्रा होय.
कान्होपात्रा ही मंगळवेढा येथील संत होय. तिचा जन्म मंगळवेढा येथीलच शामा गणिकेच्या (नायकीणीच्या) घरी झाला. तिचा कालखंड शके 1390 इ.स. 1468 हा आहे. घ्कान्होङ हे तिचे नाव घ्पात्राङ हा व्यवसाय यादव काळात घ्पात्राङ हा शब्द गणिका नावाने ओळखला जात असे. असे डॉ. विद्याधर पारंगणकर सांगतात.