Abstract : भारतदेशाला स्वातंत्र्यापुर्वी एक हजार वर्षांचा गुलामगीरीचा इतिहास होता. महंमद घोरीच्या आक्रमणापासून थेट इ.स. 1947 मधील स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत भारत अधिकृतरित्या परकीयांचा गुलाम झालेला होता. ही गुलामगीरी भारतीय लोकांच्या इतकी अंगवळणी पडली की ती केवळ राजकीय उरली नाही, तर मानसिक बनली. म्हणूनच आजही भारतीयांची गुलामगीरीची मानसिकता वारंवार सर्वत्र उमटून पडते. ही मानसिकता बदलावयाची असेल तर प्रथमत: आत्माभिमान जागृत करावा लागतो. यादृष्टीने भारताने बाह्य जगतावर कधी वर्चस्व गाजवले होते का ? असा शोध घेताना आग्नेय आशियातील अनेक देश प्राचीनकाळात भारतीय वसाहती असल्याचे स्पष्ट झाले. इंडोचायनाला भारतीय साहित्यात घ्सुवर्णद्विपङ अशी संज्ञा होती.