Abstract : आपला भारत देश सांस्कृतिक ठेव्याबाबत अतिशय संपन्न आहे. या देशास हजारो वर्षाचा सांस्कृतिक इतिहास आहे असे आपण म्हणतो. परंतू या इतिहासाची साक्ष देणारा वारसा ठेवा म्हणजे इतिहासाची साधने नेमकी कोणत्या स्वरुपात आहेत, हा वारसा ठेवा नेमका कसा ओळखायचा, त्याच्या जतनाची का आवश्यकता आहे. मानवी उन्नतीमध्ये त्याचे कोणते महत्व आहे. या वारसा ठेव्याची पाहणी (सर्वेक्षण) कशी करायची. यात कोणकोणत्या बाबी येतात, यासंबंधी स्थानिक इतिहासाच्या दृष्टीने इतिहास अभ्यासकांना, ग्रंथपालांना उपयुक्त होईल अशी मांडणी या शोधनिबंधात करण्यात आलेली आहे.