Abstract : प्राचीन काळापासून परंपरने चालत आलेल्या वर्णव्यवस्थेमुळे समाज व्यवस्थेत शुद्र आणि अतिशुद्र म्हणून ओळखला गेलेला हा बहुजन समाज जो हजारो वर्षापासून दयनीय अवस्थेत जीवन जगत होता. भारतातील ब्रिटीशकालीन आधुनिक शिक्षणामुळे या बहुजन समाजाला त्यांच्यावर होणा-या अन्याय व अत्याचाराची जाणीव होवू लागली. महात्मा फुले, राजर्षी शाहू, पेरियार, नारायण गुरु आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाची अस्मिता आणि न्याय हक्कांकरीता संघर्ष केला. डॉ. आंबेडकरांनी दलित-शोषित समाजाला केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व धार्मिक असे सर्व अधिकार मिळवून दिले. त्यामुळे ते बहुजनांची प्रेरणाशक्ती ठरले.