Abstract : महार लोक मुळातच शूरवीर होते. शिवकाळात लष्करात त्यांचाच अधिक भरणा होता. मुसलमानी अमदानीत आणि शिवकाळात त्यांनी शौर्य गाजवून शत्रूला आपल्या तलवारीचे पाणी पाजले. पेशव्यांच्या सेवेत महारांची स्वतंत्र लष्करी पथके होती. पेशवाईत रणांगणावर शौर्य गाजविणाज्या व्यक्तींना उडत रुमाल अशी बहुमानाची पदवी देण्याचा प्रघात रुढ होता. उडत रुमाल हा शब्द मूळचा मानपध्दतीचा द्योतक आहे. ज्या व्यक्तीने मोठा पराक्रम गाजविलेला असेल अशा वीराच्या भोवती लोकांनी उभे राहायचे व त्याचा जयजयकार करीत त्याच्या डोक्यावर मोर्चे व पांढरे रुमाल उडवायचे असा हा बहुमान असे.