Abstract : चांगदेव येथील मंदिरहे प्राचीन मंदिर असून 12 व्या शतकात खानदेशात यादव राजांचे राज्य होते. यादव सम्राटाचा मांडलिक राजा गोविंद याने अनेक ठिकाणीहेमांडपंथी मंदिरे बांधली त्यापौकी चांगदेव हे एक मंदिर आहे.या मंदिराच्या मूळ गाभाज्यात महादेवाचे लिंग असल्याने या मूळ महादेव मंदिरात नंतर चांगदेवाची संगमरवरी प्रतिमा बसविण्यात आली असावी.या दगडी मंदिरात चुन्याशिवाय दगडांचा वापर करण्यात आला आहे.दगड घोटून व घडवून एकावर एक बसवून भिंती उभारल्यामुळे वास्तू फार मजबूत बनली आहे.सभागृहात सोळा स्तंभ व सोळा अर्थस्तंभ असूनसोळा स्तंभ चार भागात विभागल्याने आतील रचना गुढ वाटते.या स्तंभावर दगडी कडसाची योजना असावी.परंतु परचक्रामुळे किंवा राजकीय परिस्थितीमुळे काम अर्धवट सोडावे लागले असावे व नंतर शिखराचा भाग विटांचा बांधला असावा असे म्हटले जाते.