Abstract : पेशवे काळताील ऐतिहासिक साधनांचा आणि कागदपत्रांचा अभ्यास करताना अनेक ठिकाणी दागदागिन्यांचा उल्लेख आपणास दिसून येतो. सरदारकीचे वस्त्रे बहाल करताना एखाद्या लढाईत मदुर्मकी गाजविल्यानंतर बक्षीस म्हणून किंवा बादशहा, सरदार आणि राजे किंवा महापुरुषांच्या दर्शनला जाताना एखाद्या धार्मिक स्थळलाा भेट देताना निरनिराळे दागिने, नजराणा अथवा भेट म्हणून देण्याची परंपरा त्याकाळता होती. छत्रपती शाहुंनी अनिर्बंध असे अधिकार पेशव्यांना दिल्यामुळे हळूहळू सातात्याचे सत्ताकेंद्र पुण्यातच निर्माण झाले. दागदागिन्यांच्या निर्मितीला अतिशय संपन्न असा काळ पेशव्यांच्या हौसेमुळे व चोखंदळपणामुळे निर्माण झाला. शाहूने स्वत: महाराष्ट्राला आल्यानंतर प्राेत्साहन देण्यासाठी अनेक सरदारांचा वस्त्रे, अलंकार व दागिने देऊन बहुमान केला.