Abstract : ''माणूस हा जन्मत: शहाणा नसतो तर त्याला शिक्षण दिल्याने तो शहाणा बनतो'' या विचाराचे पाईक असणारे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या 1875 ते 1929 या कालावधीत बडोदा संस्थानचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले. भारतातील अनेक संस्थानापैकी बडोद्याचे संस्थान हे प्रगतशील व प्रथम श्रेणीचे संस्थान होते. त्यांच्या विचारावर बिटिश शासनव्यवस्थेचा, त्यांच्या धोरणांचा प्रभाव असुनसुद्धा भारतीय समाजातील समस्या सोडविण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी प्रभावी अशा उपाययोजना, कार्यक्रम तयार करण्याचे आणि प्रत्यक्षात व्यवहारात आणण्याचे त्यांचे धोरण होते. त्यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान महत्वपूर्ण ठरते. महाराज सयाजीराजे यांनी सुधारणावादी व उदारमतवादी धोरणाने बडोदा संस्थानात शिक्षणाच्या गंगोत्रीचा प्रवाह वाहता केला.