Abstract : स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात इंदिरा गांधी यांचे योगदान अत्यंत निर्णायक व व्यापक स्वरूपाचे आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी केवळ राजकीय नेतृत्वच केले नाही, तर सामाजिक, आर्थिक, संरक्षण व परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात मूलगामी बदल घडवून आणले.