आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत राजर्षी शाहू महाराजांचा बहुमोल वाटा आहे. बहुजन समाजाचा उध्दार करणा-या महात्मा फुल्यांचा वारसा चालविणारा राजा म्हणून महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदुस्थानच्या इतिहासात त्यांचे एक महत्वपूर्ण स्थान आहे.