Abstract : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी जीवनातून नागपूरच्या पुण्यभूमीला वगळता येणे कठीण आहे तर नागपूर क्षेत्रातील ऐतिहासिक कार्यातून कामठी क्षेत्राला वगळणे कठीण आहे. कामठीचे नाव उच्चारताच आणि बिडी मजुरांच्या चळवळीची आठवण काढताच एक निष्ठावंत निर्भिड व निश्चयी व्यक्ति आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजे अॅड. दादासाहेब कुंभारे हे होत.