Abstract : भारतीय शास्त्रीय नृत्य ही भारताच्या सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा आणि प्राचीन घटक आहे. या नृत्यपरंपरेत स्त्रियांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. प्राचीन काळी मंदिरांमध्ये देवदासी परंपरेच्या माध्यमातून स्त्रिया धार्मिक आणि सांस्कृतिक विधींमध्ये नृत्य सादर करीत.