सांस्कृतिक सोलापूर- एक दृष्टिक्षेप
Volume : II Issue : I September-2015
अमिता नागणे
ArticleID : 154
Download Article
Abstract :

सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर असून या शहरास ऐतिहासिक व धार्मिक इतिहास आहे. हे शहर मुंबई - मद्रास रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून ते महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवर वसले असल्याने येथे मराठी, कानडी आणि तेलगु भाषिक लोक मोठ¶ा प्रमाणावर राहतात. सोलापूर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून इ. स. 1838 मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, करमाळा, इंडी, हिप्परगी व मुध्देबिहाळ इत्यादी विभाग एकत्र करून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. इ. स. 1869 मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर हे विभाग सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले होते. इ. स. 1949 मध्ये अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा या तीन नवीन तालुक्याची निर्मिती करून ते सोलापूर जिल्ह्यास जोडण्यात आले. इ. स. 1956 मध्ये महाराष्ट्र राज्याची पुनर्रचना केल्यानंतर सोलापूर जिल्हा द्विभाषिक मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आला आणि सन 1960 पासून हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा भाग बनला.

Keywords :
References :

Recent Articles

Read More >>

Publication Place

Shri Ashok Shivaji Ekaldevi
Sr No 33/8/6 Wadgaon,
BK FL At No10,
Dnyanesh Apart
Pune - 411041
Mob : +91-9422460023
Email : g.sanjayjee@gmail.com